इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२५:येथील श्रीकाळामारुतीमंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाची सांगता रविवारी महाप्रसाद वाटपाने करण्यात आली. भगतरामजी छाबडा आणि नितीन जांभळे यांचे हस्ते आणि प्रकाश दत्तवाडे व मंडळाचे अध्यक्ष नंदु ऊर्फ बाबासो पाटील उपाध्यक्ष मनोहर हिराणी यांचे उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसादाचा१५ हजार भाविकांनी लाभ घेतला.
येथील श्रीकाळामारुतीमंदिर सुमारे २०० वर्षापूर्वीचं संस्थानकाळातील असून मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत १३ डिसेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दररोज दुपारी २ ते ६ या वेळेत मराठी श्री रामचरितमानस रामायणचा भव्य स्क्रीनद्वारे सामुदायिक संगीत पारायण सोहळा तर दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सांप्रदायिक किर्तन होते. तर मुख्य दिवशी तब्बल नऊशे किलो फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडले. यावेळी भागवत कथाकार किर्तनकार हभप महादेव चौगुले महाराज लिखीत ‘भक्ती सुत्रामृत‘ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महिला अध्यक्षा सौ. वैशाली गजगेश्वर, उपाध्यक्षा सौ. सुनिता पाटणकर, माऊली सुभाष तोडकर, राहुल डांगे, उमेश कनोजे, हभप उपासे महाराज, मारुती देशींगे, किशोर मेटे, संजय बेळगी, रंगनाथ, धिरज होगाडे, बजरंग डोईफोडे, सागर मुसळे, दत्तात्रय डांगरे, सुनील मुसळे, तात्यासाहेब पुजारी, मिश्रीलाल बजाज, गोवींदजी सोनी, संजय मुसळे, हेमाराम प्रजापती, राहुल खामकर, अनिल मेटे, प्रकाश डांगरे, चंद्रकांत हावरे, राहुल डांगे, उमेश कनोजे, सुहास खामकर, शांताराम मगदुम, श्रीकांत टेके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व भाविक हजर होते.