इचलकरंजी –विजय मकोटे
दि.७ : बांधकाम आणि इंटिरियर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डिझाईनय ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आलेले विठ्ठल तोडकर यांचा बिल्डर्स असोशिएशन इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी आणि आर्किटेक्ट अॅन्ड इंजिनिअरींग असोशिएशन यांच्या वतीने क्रेडाईचे संस्थापक अध्यक्ष नितीन धुत, क्रेडाईचे अध्यक्ष मयुर शहा, बिल्डर्स असोशिएशनचे अध्यक्ष फैयाज गैबान, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खंडेराजुरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बांधकाम आणि इंटिरियर क्षेत्रात नांवलौकिक निर्माण करणार्या विठ्ठल तोडकर आणि असोसिएटस् यांना या वर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील मानाच्या प्रीमियम रेसिडेन्सीयल अंतर्गत ‘आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईन फर्म ऑफ द इयर 2024‘ पुरस्काराने गौरविण्यात आले. दोन दशकांपासून बांधकाम क्षेत्रात विठ्ठल तोडकर यांनी आपल्या कामातून नांवलौकिक मिळविला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी फूडमॉल, बंगलो, अपार्टमेंट यासारखे प्रोजेक्ट साकारत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे नितीन धुत यांनी सांगितले.
याप्रसंगी संजय रुग्गे, प्रितेश शहा, शितल काजवे, स्वप्निल शहा, राजेंद्र शिंत्रे, पुंडलिक जाधव, भगवान कांबुरे, सय्यद गफारी, जहीर सौदागर, सम्मेद मगदूम आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.