कबनुरात पुन्हा मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु

कबनूर : प्रतिनिधी 

दि .कोल्हापुरात झालेल्या सभेत जीरंगे पाटील यांना पुन्हा उपोसंनासाठी मराठा  समाजाला केलेल्या सुचणे प्रमाणे कबनुरात मराठा समाजाच्या वतीने पुन्हा साखळी उपोषण सुरु झाले आहे . आरक्षण मिळेपर्यंत समाजाचा लढा सुरूच राहील असे प्रतिपादन सुनील इंगवले  यांनी या वेळी  केले. कबनूर मराठा समाजाच्या वतीने येथील देशभक्त रत्नाबा कुंभार चौकात मनोज रंगे पाटील यांनी कोल्हापूरचे सभेत केलेल्या आव्हानुसार पुन्हा १  डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील यांनी स्वागत केले. सौ मंगल इंगवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पहिल्या दिवशी सुनील इंगळे प्रा.रवींद्र पाटील ,महेश शिवूडकर व अनिल साळुंखे उपोषण बसले. यावेळी चंद्रकांत आडेकर ,दत्तात्रय पाटील, पै. अण्णासो निंबाळकर ,बाबासो कोकणे ,संदीप जाधव, दत्तात्रय शिंदे, विष्णू चव्हाण, सुनील कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी मिलिंद कोले , आप्पासाहेब पाटील, शिवाजी चव्हाण, हुसेन मुजावर, जयदीप इंगवले ,रघुनाथ हलवणकर,  शशिकला इंगवले आदी उपस्थित होते.