शाहीन इस्लामिक क्विझ कॉन्टेस्टमध्ये चाँद उर्दू हायस्कूल ला द्वितीय क्रमांक

मिरज:प्रतिनिधी

दि:०१: जानेवारी:  शाहीन इस्लामिक क्विज कॉन्टेस्ट 2024 मध्ये मिरज येथील चाँद उर्दू हायस्कूलच्या कु. सुफिया सय्यद कु. हिबा काजी, कु साबेरा बागवान या नववी च्या संघाने चुरशीची लढत देत फायनल पर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक पटकाविला. या संघाला पारितोषिक म्हणून रोख 9000 रुपये शाळेला शील्ड सर्टिफिकेट प्रत्येक विद्यार्थिनीला सिल्वर रिंग असे बरेच पारितोषिक प्राप्त झाले आहेत

ही स्पर्धा कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा ,कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील सोळा उर्दू हायस्कूलच्या नववी च्या संघाने सहभाग घेतला होता स्पर्धेचे संयोजन शाहीन एज्युकेशन सोसायटी कराड संचलित शाहीन हायस्कूल तर्फे करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीन सोसायटीचे सचिव अय्याज भाई बागवान शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक मा .अलनासिर मोमीन सर प्राथमिकचे मुख्याध्यापक मा. सय्यद सर व शाहीनच्या पूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा. शफी बागवान साहेब व सचिव मा. अख्तर बागवान सर व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर माननीय अंजुम बागवान यांची प्रेरणा लाभली.

मुख्याध्यापिका तबस्सूम पालेगार यांच्या मार्गदर्शनाखाली सादेका अंजुम पिरजादे व इकरा मोहम्मद हुसेन शेख यांनी संघाची तयारी करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले