हिंदू मुलींना संरक्षण न देणाऱ्या काँग्रेस सरकारचा चिकोडी भाजपा कडून धिक्कार

 चिक्कोडी:वैशाली भोसले 

दि २२ : चिक्कोडी शहरात भाजपा चिक्कोडी जिल्हा व ए.बी.व्ही.पी च्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीच्या हत्येचा निषेध करत राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले  आणि चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले, यांनी तीव्र  निषेद करून, काँग्रेस सरकारचा धिक्कार करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी आंदोलनात  आंदोलकांनी प्रचंड गर्दी  केली  होती 

कॉलेज कॅम्पसमधील एका खुद्द काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीला न्याय देऊ न शकलेले हे सरकार लाखो कन्नडिगांचे रक्षण करेल का, याची काय गॅरंटी आहे? नेहाची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. दिवसाढवळ्या ही हत्या होऊनही डोळे झाकून बसलेल्या सरकारच्या कृतीचा राज्यातील जनतेने तीव्र निषेध केला आहे. खटला भरकटून गुन्हेगाराचा बचाव केल्यास राज्यव्यापी लढा उभारला जाईल, असा इशारा राज्य सरकारला दिले.

यावेळी राज्यसभा सदस्य श्री ईरण्णा कडाडी, आमदार श्री दुर्योधन ऐहोळे, श्री पी.एच. पुजार, श्री बसवराज हुंद्री, यांच्यासह, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ए.बी.व्ही.पी संघाचे विद्यार्थी आणि विविध हिंदू संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.