इचलकरंजी –हबीब शेखदर्जी
दि ११ :इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध पक्षातील पदाधिकारी, नेतेमंडळी सर्वांगिण विकासासाठी राहुल आवाडे यांच्यासोबत येत आहेत. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय काँग्रेस इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा सौ. मीना धोंडीराम बेडगे, स्वाभिमानी पक्षाचे इचलकरंजी शहर अध्यक्ष विकास चौगुले, गोपाळ उरणे व विद्याधर पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.
या सर्वांचा केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते स्कार्फ घालून सत्कार करण्यात आला. राहुल आवाडे यांनी संपूर्ण मतदारसंघात विविध माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांचा विजय निश्चित मानला जात असून विविध पक्षातील अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते हे आवाडे यांच्यासोबत म्हणजेच भारतीय जनता पार्टी पक्षात सामील होत आहेत.
रविवारी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत युवा संवाद मेळावा पार पडला. त्यामध्ये इचलकरंजी शहर काँग्रेस महिला अध्यक्षा सौ. मीना बेडगे, स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष विकास चौगुले, गोपाळ उरणे व विद्याधर पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. पदाधिकारी व नेतेमंडळींच्या येण्याने भाजपा उमेदवार राहुल आवाडे यांचा विजय सुकर बनत चालला आहे. मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण राहुल आवाडे यांच्यासोबत असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
त्याचबरोबर जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रविणभाई माणगांवे, इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष विष्णू चव्हाण आणि सदाशिव आंबे यांनीही राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. तर पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) चे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश सावर्डेकर, हातकणंगले युथ फोर्स तालुकाध्यक्ष आनंदराव कांबळे, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनीही भाजपाचे उमेदवार राहुल आवाडे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेत प्रचाराची धुरा सांभाळली आहे.