शरद आयटीआयमध्येदिक्षांत समारंभ

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

यड्राव: सलीम माणगावे 

दि .२६ :विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञानास थेअरीची जोड देवून स्वंयरोजगार निर्माण अथवा I नोकरी करावी. आय.टी.आय.ची पदवी तुम्हावा अत्यंक कमी वयात मिळाली आहे. त्यामुळे शिक्षण न थांबवता पुढील शिक्षण घ्यावे. आयटीआयनंतर डिप्लोमाला थेट व्दितीय वर्षाला प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेवून करिअर करावे. असे आवाहन डिन प्रा. बाहुबली संगमे यांनी केले. ते सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (शरद आयटीआय) दिक्षांत समारंभात बोलत होते.

यावेळी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. व्दितीय वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इलेक्ट्रीशन विभाग- यश पाटील, प्रज्वल पाटील, राहूल पुजारी, फिटर- रजत कांबळे, मिध्देश पाटील, हर्षवर्धन ठोंबरे, मोटर मेकॅनिकल व्हेइकल ओंकार रजपूत, सैफ मोमीन, आदर्श मंगुटकर, वेल्डर- रहिम मुजावर, ओम सोलांकुरे, रेहान मुल्ला यांनी तर प्रथम वर्षातील इलेक्ट्रीशन- अमुदुल्ला जमादार, महम्मदताहिर मुजावर, प्रणव कुंभार, फिटर- विठ्ठल कोरवी, प्रथमेश शंकार्ती, मंतोष पाटील, मोटर मेकॅनिकल व्हेइकल श्रेयश मगदूम, प्रथमेश माळी, ओंकार कुंडाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रा. आर. वी. माने यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य आर.वी. भरमगोंडा यांनी केले. मूत्रसंचालन एस.जे. चावरे यांनी केले. आभार एस.बी. जाधव यांनी मानले.