मिरज हाई स्कूल मिरज येथे उरुस निमित्त पाळण्यासाठी देण्यात येणारे ग्राउंड चा स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे करण्याची मागणी..

धर्मवीर आनंदा दिघे युवा प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

मिरज:प्रतिनिधी

दि:१९:Jan: सालाबाद प्रमाणे हजरत मिरा साहेब दर्ग्याचा उरूस येत्या पाच ते पंधरा तारखेपर्यंत साजरा करण्यात येत आहे मागील वर्षी उरूस निमित येणारे पाळणे व इतर खाऊची दुकाने हे मिरज हायस्कूल च्या ग्राउंड वर लावण्यात आली होते . यावर्षीही सांगली मिरज कुपवाड महापालिका जाहीर लिलाव बाबत सूचना केली आहे की दिनांक ०५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी 2024 अखेर भाडेतत्त्वावर देण्याचा येणार आहे 

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली येथे निवेदन देऊन ही मागणी केली आहे की मिरज हायस्कूल मिरज येथे पाळण्याला जागा देण्याऐवजी याचे स्थलांतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे करण्यात यावे

निवेदनात म्हंटले आहे की मिरज हायस्कूल मिरज येथे दहा दिवस पाळणे व इतर दुकाने लागल्यामुळे दिवसभर लोकांचे गर्दी होत असते व यामुळे भारताच्या भविष्य घडवणारे विद्यार्थ्यांचा फार मोठा शैक्षणिक नुकसान होत आहे

मिरज हायस्कूल येतं पाळणे व इतर दुकाने लागल्यामुळे वाहतुकाची फार मोठी कोंडी होत असते या या सर्व बाबींचा विचार करून पाळणे व खाऊ पदार्थ दुकानदारांना मिरज हायस्कूल एवजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मिरज येथे देण्यात यावे ही विनंती करण्यात आली आहे