शिरोळ:राम आवळे
दि .९: महायुती मधील तीनही पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढायला नाकारणाऱ्या अपक्ष उमेदवाराला त्या पक्षातील कार्यकर्ते का मदत करीत आहेत हे कळायला मार्ग नाही. गद्दार आमदारांनी मतदारांना न विचारता ५० खोके घेऊन, पक्षाचा घात करून, बेकायदेशीर सरकार स्थापन केले आहे. सख्ख्या भावाला आत्महत्येला करायला लावून तीन भाऊ बहिणींचे लाडके भाऊ बनण्यासाठी रस्सीखेच करीत आहेत. अशा महायुतीच्या अविश्वासू नेत्यांना पाठबळ देऊ नका. मविआला विजयी करा, असे आवाहन माजी जि. प. सदस्य महादेवराव धनवडे यांनी केले.शिरोळ विधानसभेचे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ उदगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दत्ता बंडगर होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे म्हणाले, राज्यात चोरांना आणि चोरांच्या टोळीला थांबविण्यासाठी तसेच कोणत्या विचारसरणीच्या हातात राज्य आणि देश द्यायचे याची ही निवडणूक आहे. शेवटच्या दोन दिवसांत अनुचित प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविआ मधील तीन पक्ष आणि मित्र पक्षांनी एकजुटीने काम करून शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी काम करू इच्छिणाऱ्या गणपतराव पाटील यांना निवडून देऊया. ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे म्हणाले, विशिष्ट समाजाची मते घेण्यासाठी ५ वर्षांत अनेकदा निष्ठा बदलणारे गद्दार आमदार भगवा विसरले आहेत. फक्त विकासावरच बोलणाऱ्या गणपतराव पाटील यांच्या सारख्या निष्ठावंत, सज्जन माणसाला निवडून दिल्यास मोठा विकास होऊ शकतो.
जयसिंगपूरचे माजी नगरसेवक सर्जेराव पवार म्हणाले, जयसिंगपूर मध्ये काय होणार याची झलक दाखविली आहे. जयसिंगपूरचा सात बारा आपल्या नावावर असल्यासारखे वागणाऱ्या मालकांचा सात बारा जनता निश्चितच मतपेटीतून कोरा केल्याशिवाय राहणार नाही. उमेदवार गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी काम करून सर्वांगीण विकासाचे आपले व्हिजन स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, हाजी असलम शेख, बाबासाहेब नदाफ, जीवन बरगे, स्नेहलता देसाई, पद्माकर देशमुख, शुभम कांबळे, कु. बुशिरा खोंदू, अमन पटेल यांनी गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक स्वाती सासणे यांनी केले. रामभाऊ बंडगर यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला. डी. एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समितीने पाठिंब्याचे पत्र गणपतराव पाटील यांना दिले. सूत्रसंचालन शेखर कोरे यांनी केले. आभार दत्ता बंडगर यांनी मानले. शोभा कोळी, विक्रमसिंह जगदाळे, चंद्रकांत जाधव घुणकीकर, वैशाली शिंदे, गुंडाप्पा पवार, महेश भोसले, संजय अणुसे, वसंतराव देसाई, सुरेश पांढरे, राजू पाटील, राजश्री मालवेकर, रेखा पाटील, शशिकला वाडीकर, योगेश पुजारी, कविता चौगुले, विशाल जाधव, रमेश पाटील, शहेनशहा जमादार, दिलीप गुरव, दत्तात्रय कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.