शिरोळ:राम आवळे
दि.१४ :देशातील शेतकरी संकटात आहे. राजकर्त्याकडून शेतकऱ्याला महत्त्व दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे चांगला दर मिळत नाही. यामुळे शेती करण्यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड त्यांना करता येत नाही. आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेसचे मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती, पण महाराष्ट्र राज्यातील ट्रिपल इंजिनचे महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही. ते फक्त आश्वासन देतात. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचविण्यासाठी मविआच्या सरकारला निवडून द्या, असे आवाहन गुलबर्गाचे आमदार बी. आर. पाटील यांनी केले.
महायुतीचे सरकार फक्त पेटवायचे काम करत असून आपल्याला महात्मा गांधींचा भारत करण्यासाठी गणपतराव पाटील यांच्यासारख्या सज्जन माणसाला निवडून द्या. ते धोका देणार नाहीत, भांडणे लावणार नाहीत, प्रामाणिक काम करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
हेरवाड (ता. शिरोळ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. प्रारंभी गावातून पदयात्रा काढण्यात आली. विविध ठिकाणी महिला व ग्रामस्थांनी गणपतराव पाटील यांच्यावर पुष्पृष्टी करून, रांगोळी काढून स्वागत केले. गणपतराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा अश्विनीताई माने म्हणाल्या, स्वर्गीय सा. रे. पाटील साहेबांनी शिरोळ तालुक्याचा मोठा विकास केला आहे. त्यांनी जे काम केले त्याची परतफेड करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली देण्यासाठी गणपतराव पाटील यांना निवडून आणा. गद्दार लोक आमिषे दाखवत असून दमदाटीही करत आहेत. अशा भ्रष्ट लोकांच्या महायुती सरकारला पराभूत करून मोदी सरकारची हुकूमशाही संपवा.
वैभव उगळे, गजानन पाटील, स्नेहा देसाई, पृथ्वीराजसिंह यादव, सुरेश देबाजे, चंद्रकला पाटील, भरत पोवार, बाबासाहेब नदाफ, स्वाती सासणे, अनिरुद्ध कांबळे यांनी मनोगतातून गणपतराव पाटील यांना जनतेचा आमदार म्हणून निवडून देण्याची विनंती केली. सुकुमार पाटील यांनी स्वागत केले.
या काँग्रेस पक्षाचे निरीक्षक नारायण राव, दिलीप पाटील, राजू आवळे, वसंतराव देसाई, सुभाष देबाजे, प्रतापराव देसाई, आसिफ विजापूरे, बाबासो देबाजे, कलगोंडा पाटील, राजमाला पाटील, मीनाज जमादार, भोला शिंदे, बाळासो माळी, वैभव पाटील, निगोंडा पाटील, मोहन बरगाले, राजेंद्र प्रधान, रघुनाथ पुजारी, हसन देसाई, विशाल जाधव, दस्तगीर जमादार, नरसगोंडा पाटील, सचिन पाटील, चाँदसो जमादार, महेंद्र बागे, सचिन पाटील, दिलीप ढोणे, विलास कांबळे, गजानन पाटील, गणेश पाखरे, राजू पाटील, विक्रमसिंह जगदाळे, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, सदाशिव माळी, अर्चना पाटील, दत्तात्रय कदम, संजय अनुसे, मेघा गायकवाड, गायत्री कुरुंदवाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.