खेड, दि. ३:
हक्क आणि अधिकार हे मागून मिळत नाहीत, तर त्यासाठी संघटितपणे लढा द्यावा लागतो. समाजाने एकत्र येऊन संघटित राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका शाखा – खेडचे अध्यक्ष श्री. शंकर बाईत यांनी केले.
*✨ अद्विता फर्निचर ✨*
*इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, मोबाईल आणि आता फर्निचरचे अद्वितीय कलेक्शन!*
*प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू!*
*सर्वात स्वस्त ५ दिवस – विशेष ऑफर!*
*डाउन पेमेंट ₹० | ०% व्याजदर | बजाज फायनान्स उपलब्ध*
* स्थळ:*
तुरळ-कडवई रोड, मुंबई-गोवा महामार्गाच्या शेजारी,
ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
* संपर्क:*
7350270447 / 9322886712.
दिवा येथील साऊथ इंडियन इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कुणबी समाजाच्या स्नेह मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकारिणी सदस्य श्री. नवनीत पिंपरे, खेड ग्रामीण सचिव श्री. सचिन गोवळकर, श्री. सुधीर वैराग, श्री. पांडुरंग पाष्टे, मुंबई शाखा खेडचे श्री. सुरेश मांडवकर, श्री. संदीप दोडेकर, श्री. रूपेश तांबट, श्री. संजय जाधव, श्री. दिनेश मांडवकर, मुंबई कुणबी युवा संघाचे श्री. मंगेश मांडवकर, श्री. प्रविण शिबे, श्री. विलास मुकणाक, श्री. शैलेश शिगवण, श्री. पंकज तांबट, श्री. परशुराम निर्मळ, श्री. बबन भागणे, श्री. शिवाजी बाईत, श्री. जयेश हूमणे तसेच मुंबई, ठाणे आणि दिवा परिसरातील कुणबी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना श्री. शंकर बाईत म्हणाले की, कुणबी समाज हा संख्येने मोठा असूनही विखुरलेला असल्याने त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे समाजाने एकत्र येऊन संघटित होणे आवश्यक आहे. अशा स्नेह मेळाव्यांच्या माध्यमातून समाजबांधवांनी जवळ येऊन एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. समाजातील प्रश्नांवर विचारविनिमय व्हावा, म्हणून असे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.
ते पुढे म्हणाले की, कुणबी समाजाच्या जातीच्या दाखल्यासंदर्भातील अनेक अडचणी होत्या, त्या कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या आहेत. यापुढेही संघटनशक्तीच्या जोरावर समाजहिताचे निर्णय घ्यावे लागतील.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना श्री. सचिन गोवळकर म्हणाले की, पती नसलेल्या स्त्रियांना हळदीकुंकू तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये डावलले जाते, हे योग्य नाही.
ते पुढे म्हणाले की, पती मयत होण्यात स्त्रीचा काहीच दोष नसतो, त्यामुळे अशा स्त्रियांना समाजाची खरी गरज आहे. त्या स्त्रियांना धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सन्मानपूर्वक सहभागी करून घ्या. “नवरा असणे” हा बाईच्या मूल्यमापनाचा केंद्रबिंदू ठरू नये.
यावेळी त्यांनी समाजातील जमिनीच्या कुळाच्या समस्या, जातीचे दाखले व जातनिहाय जनगणना यासंदर्भातही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात श्री. नवनीत पिंपरे, श्री. सुधीर वैराग, श्री. मंगेश मांडवकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. सुरेश मांडवकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. राजेश मेटकर यांनी केले.