सांगली:प्रतिनिधी
दि:०४:Jan: येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि मानद वन संरक्षक अजित उर्फ पापा पाटील (वय ७४) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्य पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले होते. अजित पाटील यांनी अनेक मोहिमा केल्या होत्या. कृष्णा आणि इंद्रावती मोहिमेतही ते सहभागी होते. पक्षी, प्राणी, निसर्ग संवर्धनाप्रती केलेल्या कामाबद्दल नुकतेच त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बाबा आमटे यांचे आनंदवन प्रकाश आमटे यांचे हेमलकसा या प्रकल्पाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. सांगली जिल्ह्यातील चांदोली व्याघ्र प्रकल्पासाठी त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक पाटील यांचे ते थोरले बंधू होते. गुरुवारी सकाळी अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले