जयसिंगपूरचे माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रेे यांचा गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा

शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी संधी द्या : गणपतराव पाटील

जयसिंगपूर : राम आवळे 
दि .१० :शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कोणतेही पद अथवा सत्ता नसताना शिरोळ तालुक्यातील विकासाकरिता आपले योगदान दिले आहे. तालुक्यातील नापीक जमीन क्षारपडमुक्त करून शेतकर्‍यांचे हित जोपासले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी मिळवून दिली. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. स्वच्छ मनाचा व चरित्र संपन्न उमेदवार आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक आहे. तसेच ते वडार समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतील. यासाठी आम्ही या निवडणुकीत गणपतराव पाटील यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा जयसिंगपूरचे माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे यांनी केली.
यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले की, जयसिंगपूर शहरात वडार समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांच्या रोजगारासाठी लागणार्‍या जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी व कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील पुढाकार घेऊन या वडार समाजाचा रोजगाराचा प्रश्न निश्चितपणे सोडवू. तसेच शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तालुक्यातील शेतजमीन क्षारपडमुक्त करून शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक नंदनवन फुलविण्याची गरज आहे. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या आग्रहाखातर मी या निवडणुकीत उभा राहिलो आहे. आपण एक वेळ संधी द्यावी. शिरोळ तालुक्याचा आयडॉल विकास करून दाखवेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर, सर्जेराव पवार, युनूस डांगे, संजय पाटील कोथळीकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते चंगेजखान पठाण, महेश भोसले, संतोष नलवडे, सिध्दू चौगुले, काशिनाथ कुराडे, गजानन पवार, राजू सिध्दराज गाडीवडर, म्हेहबुब मुजावर, लक्ष्मण माने, संभाजीपूर ग्रामपंचायतीचे सदस्य रविंद्र धोत्रे, अर्जुन चौगुले, अभिमन्यू कंदगल, बाळू कांबळे, चेअरमन एकनाथ नलवडे, अभय पट्टणकुडे, सतिश माने (मेजर), पुरूषोत्तम पुकाळे यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला, पदाधिकारी उपस्थित होते.