इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .७ :विकासकामांचा धडाका लावलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून पुन्हा महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत विविध २८ कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या संदर्भातील अध्यादेश नगर विकास विभागाने शुक्रवारी जारी केला आहे. त्यामुळे शहरातील प्रलंबित नागरी सुविधांची पूर्तता होऊन वस्त्रनगरीचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून विधानसभा निवडणूकीत दिलेल्या वचनांची पूर्तता होत असून प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रश्न एकापाठोपाठ एक मार्गी लागत आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच मागील महिन्यात राज्य शासनाने नगरोत्थान महाभियानांतर्गत५१ .९५ कोटी रुपयांचा निधी त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान अंतर्गत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या कामांसाठी दीड कोटी मंजूर केला आहे. त्याचबरोबर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ व खोतवाडी या ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे. या सर्व कामात माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे. त्याचबरोबर यंत्रमाग व्यवसायाला भेडसावणार्या वीज सवलतीचा प्रश्नही आमदार आवाडे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे.
आता पुन्हा महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजने अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील १ ते ३१ प्रभागातील रस्ते, गटारी, संरक्षक भिंत उभारणे, शौचालयांचे नुतनीकरण, सांस्कृतिक सभागृह, पथदिवे बसविणे आदी विविध 28 कामांचा समावेश आहे.
राज्यातील सरकार हे गतीमान विकासाचे सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे इचलकरंजीतील प्रलंबित कामांना गती आली आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीतून शहरातील सोयी-सुविधा पुरविल्या जाणार असून शहराचा विकासात्मक कायापालट होणार असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.