कडवई:
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील पुढील कामाना मंजुरी देण्यात यावी असे पत्र माननीय विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्याकडे पत्र देऊन विनंती करण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस डॉ.अमितजी ताठरे यांनी दिनांक 17/10/2022 रोजी आमदार प्रसाद लाड यांना या कामासाठी निवेदन दिले होते.त्याची दखल घेत माननीय विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या कडून रत्नागिरीचे पालक मंत्री माननीय उदय सामंत यांना दिनांक 12/11/2022 रोजी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.यामध्ये धामणी तालुका संगमेश्वर येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ते जोगळेवाडी,गावडेवाडी,कुंभारखाणी,पीरधामापूर रस्ता,कडवई येथील शिंदे साळवीवाडी-कुंभारवाडी कडवई रेल्वे स्टेशन रस्ता,गोळवली किंजळकरवाडी विंजलेवाडी बौद्धवाडी ग्रामदेवता मंदिर रस्ता,देवरुख वाशीफाटा ते शाळा,ग्रामपंचायत ते वासकरवाडी,पाठारवाडीपर्यंत रस्ता डांबरीकरण,शिवणे पिंपळ ते व्हाया कोसुंब रेवाळेवाडी रस्ता डांबरीकरण अशा कामांना निधी देण्यात यावा अशी विनंती माननीय विधान परिषद आमदार, विधान परिषद प्रतोद,सार्वजनीक उपक्रम समिती सदस्य,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,संचालक मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि.यांच्याकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.