गणपतराव पाटील हेच स्व. सा. रे. पाटील साहेबांचे खरे वारसदार

शिरोळ:राम आवळे 
दि .१२ : स्व. सा. रे. पाटील यांचे वारसदार आपणच आहोत असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी पत्रके काढून जातीयवाद केला जातो आहे. त्यामुळे स्व. सा. रे. पाटील साहेबांचे वैचारिक आणि राजकीय वारसदार ते असूच शकत नाहीत. गणपतराव पाटील हेच सा. रे. पाटील साहेबांचे खरे वारसदार आहेत. सा. रे. पाटील साहेबांच्यावर त्यांची श्रद्धा होती तर मग त्यांनी 2014 सालच्या निवडणुकीतून माघार का घेतली नाही? त्यांची साहेबांवर श्रद्धा नव्हती तर त्यांच्या मतावर श्रद्धा होती. विश्वासघातावरच त्यांचे राजकारण सुरू आहे, असा आरोप अशफाक मुजावर यांनी केले. तसेच विकास कामांसाठी कोणी आपल्या खिशातील पैसे देऊन आमच्यावर उपकार करत नाहीत. संविधानामुळे मुस्लिम समाजाचे अस्तित्व आहे. त्यामुळे विकास कामे केली म्हणून आम्ही त्यांनाच मते द्यायला पाहिजेत यासाठी बांधील नसल्याचेही त्यांनी सांगितले.
चिपरी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचंड मोठी पदयात्रा काढण्यात आली. महिला भगिनींनी गणपतराव पाटील यांचे औक्षण करून पुष्पृष्टीही केली. या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.
रमेश शिंदे म्हणाले, सा. रे. पाटील साहेबांनी या तालुक्याला पुरोगामी विचार दिला आहे. पण स्वतःला त्यांच्या विचारांचा आणि राजकीय वारसदार म्हणून घेणाऱ्या उमेदवारांनी साहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे ते त्यांचे वारसदार कसे होऊ शकतात? शांत, संयमी आणि कर्तृत्वसंपन्न गणपतराव पाटील हेच त्यांचे खरे वारसदार असून त्यांना निवडून देणे गरजेचे आहे.
प्रा. सुरेश भाटिया यांनी लाडकी बहीण योजना, मणिपुर, बिल्कीस बानो अत्याचार प्रकरण, दलित आणि मुस्लिम समाजातील असुरक्षिततेची भावना, जयसिंगपूर येथे आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आदी गोष्टींचा ऊहापोह केला. गणपतराव पाटील यांच्या प्रचार सभेत भाग घेणारे भाडोत्री लोक नसून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. स्वाती सासणे, राहुल जगदाळे, धोंडीराम कांबळे, अनिल कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून सा. रे. पाटील साहेब आणि गणपतराव पाटील यांचे ऋण आपण विसरणार नसल्याचे सांगितले.
यावेळी रावसाहेब भोसले, रावसाहेब चौगुले, मिलिंद जगदाळे, सुनील कांबळे, दादासो गोपणे, महादेव गोपणे, रणजीत आवळे, सर्जेराव भोसले, सुभाष पांडव, मारुती पांडव, गौतम दीक्षांत, करीम मुजावर, धोंडीराम कांबळे, पिंटू कांबळे, अशोक पवार, विवेक जगदाळे, लतीफ अत्तार, कुमार पाटील, राहुल जगदाळे, सतीश कांबळे, किरण भोसले, दिनेश कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी यावेळी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जैनापूर येथेही ग्रामस्थांनी गणपतराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.बापूसाहेब पाटील, सुनील रजपूत, स्वाती सासणे, शक्तीकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करून दादांना पाठिंबा दर्शविला. गणपतराव पाटील यांनीही आपली शिरोळ तालुक्याच्या विकासाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बाजीराव मालुसरे, मंगलाताई चव्हाण, परवीन जमादार, स्नेहा जगताप, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, गणेश पाखरे, अमन पटेल, पद्माकर देशमुख, सुरेश कांबळे, राजू आवळे, महादेव राजमाने, राहुल सावंत, बंडू कोळी, उदय रजपूत, शिवाजी सुतार, गिरीश बशेट्टी, विजय मगदूम, बळीराम कांबळे, रमेश रजपूत, दिलीप पाटील कोथळीकर, काशिनाथ कांबळे, सातगोंडा पाटील, स्वप्नील कांबळे, रोहित कांबळे, गणेश कांबळे, काशिनाथ कांबळे, राजेंद्र प्रधान यांच्यासह ग्रामस्थ, पंचशील तरुण मंडळ जैनापूरचे सर्व पदाधिकारी, हनुमान मंदिर परिसरात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.