१९४७ मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची टीका

पिंपरी-चिंचवड:प्रतिनिधि

दि:२७:जुन:आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही लक्ष्य केलं. ते काल पिंपरी-चिंचवड येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजप आमदार महेश लांडगे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

* स्वातंत्र्यावर भाष्य करताना भिडे गुरुजींनी महात्मा गांधींवर निशाणा साधत टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळाले आहेत. ते म्हणाले, स्वातंत्र्याची चळवळ सुरु असतानाच महात्मा गांधी पहिल्या दिवसापासूनच ब्रिटिशांची पाठराखण करणारे वर्तन करत आले. महात्मा गांधींची स्वातंत्र्य मिळवून देतो म्हणणारी वक्तव्य म्हणजे लफंगेगिरी होती.

* यासोबतच राष्ट्रगीतावरही त्यांनी हे आपलं राष्ट्रगीत नसल्याचं खुलेआमपणे म्हटलं आहे. जन, गण, मन हे पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी टागोरांना सुचलं होतं. काय लायकीचे लोकं, काय लायकीचं स्वातंत्र्य अन् काय झेंडावंदन असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करीत १९४७ मध्ये मिळालेलं ते हांडगं स्वातंत्र्य असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मानू पण फक्त दखलपात्र म्हणून, असं ते म्हणाले आहेत.

यंदाच्या वर्षापासून भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणाही भिडे गुरुजींनी केलीय.

त्या दिवशी भगवा झेंडा फडकवा आणि त्याची मिरवणूक काढा तिरंग्याचा आकार कमी ठेवा, असंही ते म्हणाले आहेत

* जोपर्यंत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन साजरा करतोय तो पर्यंत देशाचे तुकडे झाले म्हणून शोक पाळा, कडकडीत उपवास करायचा, असं ते म्हणाले आहेत. जोपर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकत नाही तोपर्यंत आमचं स्वतंत्र्य दुःखाच असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भिडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल हे मूळचे लेवा पाटील समाजातील आणि जळगावचे होते, असा जावई शोध लावला. ते म्हणाले, राष्ट्रध्वज निर्मितीमधील कमिटी स्थापन केली. यात महात्मा गांधींनी पाच नाव घेतली. पहिलं नाव सांगितलं अब्दुल कलाम आझाद. बसा दोन्ही हातांनी बोंबलत. तुर्कस्तानचा हा भडवा. नंबर एक द्वेष्टा. दुसरे सदस्य अॅनी बेझंट. फ्रान्सची ही बाई, तिला भारताचा पुळका आला. तिसरा आणि चौथा सदस्य म्हणजे आयसीएस ऑफिसर. रग्गड कमवून बसलेले, पेन्शन घेतलेले. पाचवे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. देश वाचविणारा माणूस. हे वल्लभभाई पटेल म्हणजे मूळचे जळगावमधील लेवा पाटील समाजातील होते. त्यांच्या आजोबांच्या काळात इकडे दुष्काळ पडला म्हणून ते गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. तिकडेच त्यांना मुलगा झाला. कालांतराने लेवा गळून पडलं आणि पाटीलचं पटेल झालं, असं ते म्हणाले

संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात वातावरण तापणार. दरम्यान संभाजी भिडे हो नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सामाजिक आणि राजकीय टीका-टीपण्णीचे धनी होत असतात. दरम्यान, नुकतेच ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी संभाजी भिडे हजारो अनुयायांसह शिवाजीनगर रस्त्यावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी भिडे यांच्या बंदोबस्तासाठी १०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले होते