हौशी कलाकार नमन मंडळ गोळवलीचा यशवंत नाट्य मंदिर, मुंबई येथे हाऊसफुल्ल शुभारंभ

 

कडवई:

 

हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांनी सादर केलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग *यशवंत नाट्य मंदिर, मुंबई (माटुंगा)* येथे हाऊसफुल्ल पार पडला. या प्रसंगी *रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्री. संतोषजी थेराडे साहेब* आपल्या सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. त्यांनी कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमात मंडळाच्या वतीने मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व कलाकार हे स्थानिक ग्रामस्थ असून आपल्या नोकरी-व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कोकणची लोककला जपण्याचे आणि ती मोठ्या मंचावर गाजवण्याचे काम केले आहे.

श्री. थेराडे साहेब म्हणाले की, “मुंबईसारख्या मोठ्या रंगमंचावर कोकणच्या लोककलेचा ठसा उमटवणे हा केवळ कलाकारांसाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणवासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.”

स्थानिक कलाकारांचा प्रभावी अभिनय,कोकणच्या लोककलेचे सादरीकरण,हाऊसफुल्ल प्रयोगाचे यश हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.

हौशी कलाकार नमन मंडळ गोळवलीच्या या यशस्वी प्रयोगामुळे कोकणच्या लोककलेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.