इचलकरंजी:हबीब शेख दर्जी
दि .१४ :महानगरपालिकेतील सफाई कर्मचार्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून घरकुले लवकराच लवकर उपलब्ध होण्यासाठी मी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे. शिवाय या कर्मचार्यांचे विविध प्रलंबित प्रश्नसुध्दा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांनी केले.
येथील कामगार चाळ येथे आयोजित प्रचार सभेत श्री. आवाडे बोलत होते. उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी प्रास्ताविकातमहानगरपालिका कर्मचार्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते मार्गी लावण्यासाठी आपल्या हक्काचा प्रतिनिधी असला पाहिजे. राहुल आवाडे हेच आपल्या हक्काचे प्रतिनिधी असल्याने त्यांना प्रभाग १२ मधून सर्वाधिक मताधिक्य देण्याची गरज असून ते निश्चितपणे मिळेल, अशी ग्वाही दिली. अमरसिंह माने यांनी, सर्वांगिण विकास आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्व कामगार राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहतील असे सांगितले.
राहुल आवाडे यांनी, कर्मचार्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपले भक्कम पाठबळ व मतरुपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन करताना महानगरपालिकेत अतिरिक्त जागा मंजूर करून बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, अविनाश कांबळे, महादेव गौड, प्रकाश मोरे, भाऊसो आवळे, अहमद मुजावर, सौ. अनिता कांबळे, सौ. गीता जगताप, सौ. संगीता कांबळे, प्रमोद बेलेकर, अरुण निंबाळकर, सिद्धार्थ कांबळे, के. के. कांबळे, मुस्ताक मोमीन, नौशाद जावळे, दतात्रय ठाणेकर, पांडुरंग कोकरे, प्रकाश कलागते, शिवाजी कांबळे, सुखदेव सोनिकर, बिरोबा बंडगर, रियाज जमादार, अरुण कांबळे, झाकीर जमादार, विनायक शिंगारे यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार चाळ परिसरातील नागरिक उपस्थित होते.