सांगली: प्रतिनिधी
दि:१०: डिसेंबर: जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावरुन जयंत पाटील राजू शेट्टी यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ऊस दराच्या आंदोलनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमचे नावे घेतली जातायत अशी टीका जयंत पाटील यांनी राजू शेट्टींवर केलीय. त्यांच्या याच टीकेला राजू शेट्टींनीही प्रत्युत्तर दिलंय. जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही, असं प्रत्युत्तर शेट्टी यांनी दिलंय
सांगली जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावरुन जयंत पाटील यांच्यावर शेट्टीनी केलेल्या टिकेवरून आता जयंत पाटील आणि राजू शेट्टी मध्ये शाब्दिक वाकयुद्ध सुरू झालेय. ऊस दराच्या आंदोलनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमचे नावे घेतली जातात, जिल्ह्यातील सर्व कारखाने चालू आहेत, सर्व कारखान्याचे गाळप व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे माझ्यावर कोण काय बोलतेय यावर भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही या टीकेला राजू शेट्टी यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटलांचे नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही. जयंत पाटलांनी आधी आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून,हे धंदे बंद करावेत असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
राजाराम बापू कारखान्यावर स्वाभिमानीकडून आंदोलन सुरू असताना शेट्टीनी जयंत पाटील यांच्यामुळे जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटत नसल्याचे म्हंटलं होते. या टीकेला जयंत पाटील यांनी कुणाचे तरी नावे घ्यायचे असतात, त्यामुळे काही लोक आमची नाव घेतात; त्याच्याशिवाय टीव्ही तरी त्याना कसं दाखवणार आहे. कुणी काही बोलत असेल तर मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. जिल्ह्यातील सर्व कारखाने चालू आहेत, सर्व कारखान्याचे गाळप व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे माझ्यावर कोण काय बोलतेय यावर भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर राजू शेट्टींनी उत्तर देताना आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून,हे धंदे जयंत पाटलांनी बंद करावे, अशी टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टींनी केली आहे. तसेच जयंत पाटलांचे नाव घेऊन चर्चेत येण्या एवढी माझी अधोगती झाली नाही,असा पलटवार राजू शेट्टींनी केला आहे.