इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि. १४ जुलै : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सर्वच विकारांवर औषध उपलब्ध आहेत . 25 डॉक्टर,90 स्टाफ नर्सेस,4 अंबुलन्स सेवेसाठी आहेत .त्याचप्रमाणे सिक्युरिटी गार्ड,शिपाई,आया,कक्ष सेवक,सेविका हे देखील सेवा देत आहेत . महिन्याभरात 8 हजार च्या आसपास रुग्णाची नोंद होत असते व त्यांच्यावर योग्य ते उपाय केले जातात, तसेच महिलांची प्रसूती साठी अतिशय चांगल्या प्रकारे महिला डॉक्टर यांच्याकडून सोय केली जाते अशी माहिती रुग्ण कल्याण कार्यकारी समिती चे सदस्य पापालाल सनदी यांनी दिली.
रुग्ण कल्याण कार्यकारी समितीच्या आढावा सभेवेळी त्यांनी बोलताना सदरची माहीती दिली
डॉ,रविंद्र शेटये यांच्या अध्यक्षखाली सदरची सभा पार पडली
यावेळी डॉ.महाडिक यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या नागरिकांसाठी औषध व उपकरणाची माहिती सांगितले. यावेळी हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ,प्रसाद दातार, सहाय्यक सीमा कदम,स्त्री रोग तज्ञ डॉ.कौसर शेख,बालरोगतज्ज्ञ सोनल ,मा.प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील,कार्यालयीन अधिकारी अविनाश चिले,तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य सुभाष मालपाणी,कपील शेटके,रवी जावळे,योगेश सनदी, विजय बोते,सौ,शिला कांबळे व ऑफिस कर्मचारी नागरिक उपस्थित होते