डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 

दि  २५ नोव्हेंबर – इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी मानद सचिव डॉ सपना आवाडे, संचालक ए.टी. कुडचे यांच्यासह संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे, डीन डॉ एस.के. शिरगावे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.