इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२५ :चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांची जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष (राज्यमंत्री पद दर्जा) पदी निवड झालेबद्दल जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धुत, ट्रस्टी प्रमुख श्रीवल्लभ बांगड, लालचंद गट्टाणी, महेश सेवा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा, उद्योगपती रामुशेठ मुंदडा, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे अध्यक्ष फैयाज गैबान, क्रेडाई प्रेसिडेंट मयूर शहा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
जैन समाजासाठी वेगळे आर्थिक विकास महामंडळ स्थापन्याची मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सकल जैन समाजाचे वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार्या या महामंडळाच्या प्रथम अध्यक्षपदी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राधामोहन छापरवाल, कमलेश राठी राधेश्याम बंग, धनराज डाळ्या, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक मुकेश खाबानी, नंदकुमार शहा, ओमजी पाटणी, राजेंद्र शिंत्रे, हर्षल धुत, आदित्य मुंदडा, प्रितेश शहा, अरुण आवटे, बबन काश्मिरे, निकेत हेरवाडे, अक्षय बिरांजे, राजकिरण चेंडके आदींसह मान्यवर उपस्थित होते.