इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .३ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या ३२ व्या ऊस गाळप हंगामासाठी येणार्या ऊसाकरीता विनाकपात एकरकमी ३१५० रूपये दर जाहीर करण्यात आला आहे. दैनंदिन१६ हजार मे. टन ऊस गाळप करीत असलेल्या या कारखान्याने यापूर्वी शेतकरी, कामगार, बँका, वित्तीय संस्था यांची देय रक्कम विनाविलंब आदा करून सहकारी साखर कारखान्यांच्या पारदर्शीपणाचे आदर्श उदाहरण कायम ठेवले आहे.
शेतकर्यांसाठी कारखान्याच्या विविध योजनांमुळे सन २०२४ -२५ या ३२ व्या गाळप हंगामाकरीता सुमारे २० ,४०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. या नोंद झालेल्या क्षेत्रातून हंगामामध्ये २० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्व सभासद, शेतकरी बंधू-भगिनींनी सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून द्यावा असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.