नागपूर : नंददत्त डेकाटे
दि. १४ ऑगस्ट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातखेडा केंद्र-महालगाव पं. स. समिती ता. भिवापूर जि.नागपूर येथे चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा श्रमदान व स्व्छता रक्षाबंधन वृक्षा रोपण, लसीकरण मोहीम आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नशा ( व्यसन) मुक्त प्रतिज्ञा देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संध्या शेगोकर यांनी विद्यार्थांना व्यसन मुक्त,नश्या मुक्त या वर मार्गदर्शन केले. श्रीमती. आशा नामदेवराव शेरकी ( अंगणवाडी सेविका) श्री. सुगंधराज म्हैसकर , श्री. रविंद्र थैरे व सौ. अमृता विशाल म्हैसकर, सौ मंदा सुधीर मसराम तसेच अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत चालू असलेल्या उत्तम कापूस प्रकल्प लोकेशन उमरेड चे प्रक्षेत्र अधिकारी अक्षय जुमनाके यांनी नशा व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन केले. श्री. राजू नवनागे यांनी विद्यार्थांना तसेच गावातील उपस्थित असलेले मान्यवर यांना व्यसन मुक्तीचे दुष्परिणाम आरोग्यास हानिकारक आहे हे पटवून दिले व