खुदाई खिदमतगार संघटनाचे अध्यक्ष ॲड. फैजल खान यांचा कोल्हापूर सदभावना दौरा

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 
दि .२५ : शांती दूत म्हणून संपूर्ण भारतभर कार्य करीत असलेले व  खुदाई खिदमतगार संघटनाचे अध्यक्ष ॲड. फैजल खान यांचा  कोल्हापूर सदभावना दौरा  स्वातंत्र्य वीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद् कबनूर  चे अध्यक्ष एन एन काझी यांनी  नियोजन केले होते. प्रथमत :कोल्हापूर येथे ॲड. फैजल खान यांनी  राजश्री शाहू महाराज यांच्या समाधी स्थळ येथे भेट देवून अभिवादन केले.कोल्हापूरचे ज्येष्ठ समाजसेवक पिटर चौधरी यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटने मार्फत मा. आनद माने यांनी शाल श्रीफळ देऊन फैजल खान यांचा सत्कार केला.


यावेळी पिटर चौधरी यांनी कोल्हाूर जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढयाची आणि राजश्री शाहू महाराज यांच्या बद्दल माहिती दिली  यावेळी सामाजिक कार्यकर्ते व  स्वातंत्र्य सैनिक वारसदार बहु संख्येने  उपस्थित होते. लोकराजा  राजश्री शाहू महाराज यांच्या समाधी स्थळ येथे येऊन वंदन करूनेचे भाग्य मला लाभले याचा मला अभिमान वाटतो असे त्यानी सांगितले.
सकाळचे संपादक  श्रीराम पवार आणि संचालक निखिल पंडित यांची त्यानी भेट घेऊन सुरू असलेल्या शांती यात्रेची माहिती सांगितली. जो रबका है वो सबका है. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच द्वेश करीत नाही. सर्वांनी आपल्या धर्माचे पालन करत दुसऱ्या धर्माच आदर करणे ही खरी मानवता आहे. असे त्यानी आपले  मत व्यक्त केले.
कबनुर येथील थोर स्वतंत्रसेनानी देशभक्त पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फैजल खान यांनी अभिवादन केले.  एन एन काझी  यांनी कबनुर येथील हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ग्राम दैवत जंदिसाहेब-ब्रानसाहेब यातील एक हिंदु आणि एक मुस्लिम धर्मीय पीर असलेचे सांगितले. ही माहिती मिळाल्या नतर मी संपूर्ण भारतामध्ये यात्रेसाठी फिरलो परंतु दोन विभिन्न धर्मियांची दर्गाह आयुष्यात  पहिल्यांदाच  पाहिली असे उद्गार काढले. .ग्राम दैवत जंदिसाहेब-ब्रानसाहेब यांचे दर्शन घेतल्यानंतर हिंदू मुस्लीम हे ऐक्याचे प्रतीक असलेल्या ग्राम दैवताचे महत्त्व  जगाला समजले पाहिजे या साठी अजमेर शरीफ ते कबनुर पर्यंत पद यात्रा आपण भविष्यात काढू असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर  क्रांतिवीर निजामुद्दीन काझी यांच्या कुटुंबाची त्यानी भेट घेतली. वीर पत्नी अश्रफबी काझी यांचे आशीर्वाद घेतले. काझी सर यांच्या कडून स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद्र याची माहिती घेतली. तसेच निजामुद्दीन काझी यांनी स्वातंत्र्य लढया मध्ये केलेले कार्याची संपूर्ण माहीत घेतली.
दिल्ली येथील अडीच लाख रुपये भाडे असणारे सभागृह आपण स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना पुरस्काराच्या  वेळी  विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा त्यांनी ग्वाही दिली
कोल्हाूरमधील स्वतंत्र लढा आणि येथील सर्व देशप्रेमी जनतेचा मला अभिमान वाटतो असे त्यानी सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमात पिटर चौद्री आनंद माने, शाहनुर सर, जयवंत देशपांडे , प्रभाकर तांबट, सईदा शेख. सुशीला खांडेकर, जीवन इंगळे फिरोझ शेख, बाबूराव कदम बाबासाहेब मिठारी उपस्थित होते. आभार सचीन जाधव यांनी केले.