लांजा: राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा येथील अजिंक्य मंगल कार्यालयामध्ये “योजना आपल्या दारी” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील सर्व समाजातील महिलांना आणि युवकांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आणि अर्ज भरविण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पमध्ये सुमारे ९०० महिलांनी विविध शासकीय योजनांसाठी अर्ज भरले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचत नसल्यामुळे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी घराघरात जाऊन योजना पोहोचवण्याचा आदेश दिला. या निर्देशानुसार, अल्पसंख्यांक नेते सोहेल मुकादम, अल्ताफ काझी, रमजान गोलंदाज, शाईन खान, अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
या उपक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, लेक लाडकी योजना, अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना, आंतरजातीय विवाह अनुदान योजना, अपंग-दिव्यांग आर्थिक योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, NULM नगरपरिषद व्यवसाय कर्ज योजना, विश्वकर्मा योजना, बांधकाम कामगार योजना, घरेलू कामगार योजना, रेशन कार्ड शिबिर, शुभ मंगळ योजना अशा विविध योजनांचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
सुमारे ९०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने आयोजित या उपक्रमाबद्दल जनतेने किरण सामंत यांचे आभार मानले.
या वेळी अल्पसंख्यांक युवा नेते सोहेल मुकादम, अल्ताफ काझी, रमजान गोलंदाज, अकील नाईक, हुसैन काझी, शफी काझी, शाईन खान, निलेश जाधव, जिब्रान तांडेल, शाहीन खान, उमेर मालदार, साहिल पटेल, दानिश पटेल, शेवाळ सिद्दीकी, शाहनवाज खान, अरबाज खान, अरमान काद्री, तोसिफ पावसकर, सोहेब पावसकर, सानिया खान, अलिशा फोडकर, आयशा काझी, अमृता वरणकर, लुबना वनु आणि इतर अनेक महिला व युवकांनी उपस्थिती दर्शवली.