सांगली:प्रतिनिधी
दि. २३: मेन मेडिएशन सेंटर, उच्च न्यायालय मुंबई यांच्याडील निर्देशानुगार सांगली जिल्ह्यातील पहिल्या सत्रातील एकूण 25 विधिज्ञांचे 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 2024 अखेर जिल्हा न्यायालय सांगली येथे आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचा उद्देश न्यायालयीन कामकाजामध्ये जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणे ही प्रशिक्षित मध्यस्थी मार्फत मिटविणे तसेच पक्षकारांचे समाधान होवून प्रकरणे निकाली करणे हा आहे. यामुळे न्यायालयाची व पक्षकारांच्या वेळेची बचत होईल.
प्रशिक्षणार्थी म्हणून सांगली, मिरज, इस्लामपूर तसेच शिराळा येथील एकूण 25 विधिज्ञ उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी मानले. यावेळी अधिक्षक, महेश गुर्लहसूर, प्रफुल्ल मोकाशी, नितीन आंबेकर, विजय माळी, गौस नदाफ उपस्थित होते.