वारकरी संप्रदायाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार

इचलकरंजीहबीब शेखदर्जी 

दि .१६ जून :महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकरी पायी दिंड्यांना राज्य सरकारकडून प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात मोलाचे प्रयत्न व पाठपुरावा केल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांचा इचलकरंजी व  आसपासच्या गावातील वारकरी संप्रदायांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हभप सदाशिव उपासे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. 

 महाराष्ट्रातून आषाढी वारीला हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने येत असतात. त्यांना राज्य सरकारने सहकार्य करावे अशी मागणी होत होती. दोन वर्षांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांच्या पुढाकाराने व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजीत भव्य वारकरी दिंड्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. याप्रसंगी अनेक दिंड्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे राज्य सरकारने वारीसाठी दिंड्यांना ५० हजाराची  मदत द्यावी अशी मागणी केली होती.
 या मागणीनुसार दोन वर्षांपासून आमदार प्रकाश आवाडे व हभप विठ्ठल पाटील हे शासनाकडे पाठपुरावा करत होते. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावून दिंड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक दिंडींला २० हजार रुपये मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.  त्याची आर्थिक तरतूद तात्काळ करण्याचे आदेश सचिवांना दिल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. तसेच आगामी काळात वारकरी संप्रदायाचे अनेक प्रश्न सोडवण्याचे अभिवचनही त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना दिले.
 यावेळी हभप सर्वश्री महादेव चौगुले, श्रीकांत टेके, बाळासाहेब धर्माधिकारी, राजाराम शिंदे, राजेद्र बैरागी, आप्पासो पाटील, एकनाथ मुळे, श्री. कुंभार, सदाशीव मांजरेकर, बाळासो ढेरे, विश्वनाथ पाटील, भास्कर तोडकर, काकासो पाटील, प्रकाश पवार आदर्श वाटेगावकर, राजु पडळकर आदिसह वारकरी दिंडीधारक हजर होते.