बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बेळगावी : वैशाली भोसले 

दि .१५ :आज कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा बेळगावी जिल्हा प्रभारी मंत्री श्री.सतीश अण्णा जारकीहोळी यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या रोड शोमध्ये सहभागी होऊन काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.डी.के.शिवकुमार, मंत्री सौ.लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार श्री.लक्ष्मी सवदी, श्री.अशोका पट्टणा, श्री.आशिफ सेठ, श्री.महांतेश कौजलागी, श्री.विश्वास वैद्य व पक्षाचे जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.