महाराष्ट्रात मुस्लिम पक्षांना स्वताचे अस्तित्व अबाधित राखनेतअपयश : अँडहोकेट जमिर खानजादे

सांगली: प्रतिनिधी

दि:२२:एप्रिल: मुस्लिमांच्या विखुरलेल्या राजकीय शक्ती पाहुन भाजप आणि संघाने २०१४ नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार डावलून निवडणुका लढवली त्याला यश ही प्राप्त झाले मुस्लिम उमेदवार मुक्त निवडणुक जिंकुन भाजपने केलेला प्रयोग इतर पक्षांनी मुस्लिम समाजाला भय दाखविण्यासाठी फायद्याचे ठरल

तरी मुस्लिम समाजाने षडयंञ ओळखुन सुध्दा फक्त भाजपला हरवण्यासाठी स्वतःची राजकीय-सामाजिक ओळख निर्माण न करता इतरांना पाठिंबा/समर्थन देण्यातच धन्यता मानली त्याचेच परिणाम आज मुस्लिम उमेदवार देणे तर दुरच मुस्लिम मतांची पण आवश्यकता नाही बोलण्या इतपत मजल राजकीय पुढार्यांची झाली आहे.

आमचा नेताच आमचा पक्ष म्हणणारे मुस्लिम कार्यकर्ते महायुतीसाठी काम करुन समाजाचा किती नुकसान करत आहेत हे त्यांना कळले पाहिजे.!

महाविकास आघाडी/इंडिया गठबंधन ने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही पण त्यांच्या अजेंडा/घोषणापञात महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काय भुमिका घेतली हे पण स्पष्ट केलेले नाही.

दर्गाह-ईदगाह-कब्रस्तान-रोड-पाणी-शादीखाना हे मुलभुत सुविधे मध्ये येतात जर हे गरजा स्थानिक प्रशासनाच्या वतीने पुर्ण होत नसेल तर नळ पट्टी/मालमत्ता कर भरण्यावर सार्वजनिक बहिष्कार टाकावा परंतु या कामासाठी समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणाच्याही पदरात टाकु नका.

शिक्षण-आरक्षण-संरक्षण-रोजगार-हक्क साठी उमेदवारास विचारणा करा.