विधी सेवा समितीच्यावतीने शरद इन्स्टिट्यूट मध्ये कायदेविषयक कार्यशाळा संपन्न.

यड्राव  : सलीम माणगावे 

दि .०२: विधी सेवा समिती हातकणंगले यांचेवतीने शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि पॉलिटेक्निक कॉलेज इचलकरंजी येथे विध्यार्थ्यांच्याकरिता कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते.याप्रसंगी इचलकरंजीचे सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर मा.श्री.बी. टी.येंगडेसो यांनी प्रमुख उपस्थित होती .

यावेळी विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग व करिअर विषयी मार्गदर्शन केले.तर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री  सचिन सूर्यवंशी यांनी सायबर क्राईम,अंमलीपदार्थ व वाहतूक कायद्याविषयी मार्गदर्शन केले व अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे कार्यकारणी अध्यक्ष ऍड शहानवाज पटेल यांनी पोक्सो कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी शहापुरचे गोपनीय पोलीस अधिकारी शशिकांत डोणे,आरोग्य विभागाचे संदिप गणबावले ,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे,अकॅडमीचे डीन – एस आर नदाफ सर,कार्यशाळा विभाग प्रमुख – आर आर शेट्टी सर तसेच प्राध्यापिका,विध्यार्थी-विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अनुजा जुगळे मॅडम यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य बी एस ताशीलदार यांनी केले शेवटी आभार अनिता यादव मॅडम यांनी मानले.