विरोधकांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध करावी

राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांचे विरोधकांना आवाहन

इचलकरंजी :विजय मकोटे 
दि १६ :संस्था निर्माण करायला वेळ लागतो पण मोडायला वेळ लागत नाही. संस्था जन्माला घालून ती वाढविणे हे खूपच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत श्री दत्त कारखाना अतिशय चांगला आणि सुरळीत सुरू आहे. त्यामुळे माझी विरोधकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी दत्तची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.इचलकरंजी येथे झालेल्या संवादसभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रकाश आवाडे पुढे म्हणाले, विकासाची भूमिका घेऊन सहकारी संस्था निर्माण करण्याची ईर्ष्या घेऊन कामे झाली. त्या संस्था जीव ओतून, जिव्हाळा लावून वाढविल्या. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यांची प्रगती झाली. श्री दत्त कारखान्याने शेतकरी सभासदांचे हित घेऊन काम केले आहे. विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत. त्यामुळे कारखाना चांगला चालला आहे हे मान्य करावेच लागेल. कारखाने ही सहकार मंदिरे, उद्योग मंदिरे असून सहकारातून समृद्धी येते. त्यामुळे सहकारी संस्था जगविणे आवश्यक आहे. याचा विचार करून विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी.
शामराव कुलकर्णी म्हणाले, शेती आणि शेतकरी यांच्या अडचणी सोडवून त्यांची उन्नती व्हावी ही भूमिका घेवून गणपतराव पाटील यांनी पुरोगामी विचार घेऊन जागतिक स्पर्धेत टिकून रहात सहकार मजबूत करण्याचे काम केले आहे. दत्त करखान्याशी इचलकरंजीकरांचे अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते असून ते टिकवून ठेवण्यासाठी सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील.
उत्तम आवाडे म्हणाले, परिसराचा विकास हा सहकारामुळे झाला असून त्याची गोड फळे आपण चाखत आहोत. दत्त कारखान्याने शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठे काम केले आहे. कोणीही उठून विरोध करणे चुकीचे आहे. विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊन गणपतराव पाटील यांना निवडून आणू.
गजाननराव सुलतानपुरे यांनी इचलकरंजीकरांच्या दैनंदिन जीवनाची नाळ दत्त करखान्याशी जुळली आहे. कारखाना सुरळीत सुरू असून सर्व सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील असा विश्वास दिला. आर. के. पाटील, आदगोंडा पाटील, विलास गाताडे यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला.
किशोर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी अनिल स्वामी, रणजीत कदम, इंद्रजीत पाटील, रघुनाथ पाटील, बाळासो पाटील हालसवडे, शेखर पाटील, हसन देसाई, बाबासो चौगुले, अशोक कोळेकर, दिलीप पाटील कोथळीकर, अशोक निर्मळे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदणी येथे नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक संजय सुतार यांनी केले. माजी जि. प. सदस्य प्रकाश परीट, राजेंद्र प्रधान, पांडुरंग रजपूत, आण्णासाहेब क्वाणे, विठ्ठल सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती दिली. गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जात आहे आणि शेतकरी सभासदांचे हित जोपासण्यासाठी विविध योजना राबवून त्यांची आर्थिक प्रगती साधली जात असल्याचे सांगून सत्तारूढ गटाला विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी सरपंच सौ. संगीता तगारे, संजय बोरगावे, प्रकाश लठ्ठे, हसन देसाई, शेखर पाटील, डॉ. सिद्राम कांबळे, दिलीप परीट, शितल उपाध्ये, दीपक कांबळे, बापूसाहेब परीट, सुभाष पाटील, अजित पाटील, बाबुराव ऐनापुरे, बापूसो माळी, अशोक निर्मळे, दिनेश बुबणे, अनंत भगाटे, महावीर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. संजय गुरव यांनी सूत्रसंचालन केले. आभार महेश परीट यांनी मानले.
यड्राव येथे धोंडोजीराव नाईक निंबाळकर, केशव क्षीरसागर, श्रीकांत निर्मळ, भाऊसो कोळी, विजयकुमार पाटील, राजगोंडा पाटील, जयकुमार पाटील, वैभव उदगावे आदी शेतकरी सभासद उपस्थित होते.