रुग्णालय खाजगीकणाला विरोध; मुस्लीम लीग पार्टीने केली जनहित याचिका दाखल..

दिवा:प्रतिनिधि

दि:२४:जुलै: कौसा भागातील एम एम व्हॅली परीसरात ठामपणे बांधलेल्या स्वतंत्रता सेनानी हकीम अजमल खान रूग्णालयाचे खाजगीकरण करण्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लीम लीग पार्टीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे

सध्यस्थितीत मुंब्रा शहराचे जनसंख्या अंदाजे १२ लाख असून यामध्ये बहुसंख्य नागरिक गरीब कुटुंबातील असून त्यांच्यासाठी शासकिय रुग्णालयाची नितांत गरज असल्याचे पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे महणणे आहे

रूग्णालयाचे खाजगीकरण करण्यात येऊ नये पक्षांचे पदाधिकारी फरहत शेख यांनी मार्च महिन्यात १० दिवस आमरण उपोषण आंदोलनही केले होते

ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्याचे तसेच सगळ्यांवर मोफत औषधोपचार कसा होईल यावर एका बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती शेख यांनी दिली