भगव्याशी गद्दारी करणाऱ्या यड्रावकरला जनता धडा शिकवेल…वैभव उगळे

यड्रावकरांना भगव्याचा इतका तिरस्कार का? की भगवा हातात घ्यायची लाज वाटते?

शिरोळ : राम आवळे 

दि :९ शिरोळ विधानसभा मतदारसंघातील गद्दार राजेंद्र यड्रावकर यांनी जनतेची दिशाभूल सुरू केली आहे आतून एक आणि बाहेरून एक अशी दुटप्पी धोरण यड्रावकराचे आहे. त्यांनी शाहू आघाडीचे नाव पुढे करून महायुतीशी हातमिळवणी करत शिरोळ तालुक्यातील मी अपक्ष उमेदवार आहे असे सांगून जनतेला फसवण्यास सुरवात केली आहे. त्यांना भगवा हातात धरायला लाज वाटते की भगव्याचा ते तिरस्कार करत आहेत याचा खुलासा त्यांनी करावा,

नकली हिंदुत्व ते ज्या जातीवादी पक्षासोबत आहेत त्यांच्याकडे आहे. त्या नकली हिंदुत्वाचा चेहरा सध्या समोर येऊ लागला असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी ते सध्या गद्दारी करत आहे. यड्रावकर सर्वांचीची फसवणूक करत असतात आता मतदारांची दिशाभूल करणाऱ्या यड्रावकर यांना जनता धडा शिकवेल गेल्या५ वर्षात शिवसेनेशी हातमिळवणी करून भगव्या झेंड्याखाली काम करणारे आमदार यड्रावकर यांना भगव्याचा विसर पडला आहे त्यांना भगवा हातात घ्यायला लाज वाटते आहे पण जनता त्यांना जागा दाखवेल कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या महालक्ष्मी समोर राज्यातला प्रत्येक नागरिक नतमस्तक होतो याच महालक्ष्मी समोर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिरोळ विधानसभेचे राजेंद्र यड्रावकर यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा शद्ब दिला आणि उध्दवसाहेबांच्या राज्यात आमदार यड्रावकरना मंत्रीपदाची संधी दिली मात्र या संधीसाधू यड्रावकरनी गद्दारी करून उध्दव ठाकरेची फसवणूक केली मात्र शिरोळ तालुक्याची जनता हे विसरली नाही. शिरोळ तालुक्यातील अवैध धंदेवाल्याना पाठशी घालून युवकांना व्यसनाधीन बनवणाऱ्या गद्दार आमदारला विधानसभा निवडणूकीत शिरोळ तालुक्यातील जनता धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख संजय अनुसे, तालुका संघटक राजू पाटील,उप तालुका प्रमुख युवराज घोरपडे, राहुल काकडे, संजय घोरपडे, किरण देसाई, विकास सुतार, युवा सेनेचे प्रतीक धनवडे,निलेश तंवदकर, महिला जिल्हा संघटीका मंगल चव्हाण, उपजिल्हा संघटीका वैशाली जुगळे,कुरूंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, महिला शहर संघटीका राजश्री मालवेकर, माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, माजी शहर प्रमुख राजू आवळे,मिलिंद गोरे, उपशहर प्रमुख,राजू बेले ,आप्पा गावडे, हरिदास शेडबाळे, आदी प्रमुख उपस्थित होते