इचलकरंजी:कयुम शेख
दि १५ :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी पी.एच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांबांबत नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह विधान केले आहे . त्याचा निषेध शहर काँग्रेस च्या वतीने महात्मा गांधी चौकात करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी अजित पवार यांचा निषेध करुन महायुती सरकारचे शैक्षणिक धोरण या विधानातुन दिसून येते तसेच बहुजन समाजाचा शिक्षणाचा अधिकार नाकारला जात असुन पुरोगामी महाराष्ट्राचा हा अवमान आहे असे व्यक्त केले. यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पी.एच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इचलकरंजी विधानसभा सभा युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे, इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष प्रमोद खुडे, गोविंदा आढाव, डॉ विलास खिलारे,एन.एस यू. आइ चे शहर अध्यक्ष रेहान नदाफ, आदित्य खोत बिस्मिल्लाह गैबान, जोश्ना भिसे
ज्योती भिसे, मधू म्हेतर,सचिन साठे, तोसीफ लाटकर, ओंकार आवळकर, निलेश पाटील, रमजान शिकलगार, पोपट शिंदे, चंद्रकांत मिस्त्री, मंथन सुतार, प्रेम तेरणी, सुदाम साळुंखे, अजित मिणेकर , राजू काटकर, राजू किणेकर,रवि वासुदेव,अनिल पच्छिन्द्रे
प्रवीण फगरे,रजनीकांत वासुदेव,योगेश कांबळे, आलम मोमीन, मिलिंद कुरणे,,सुनील वासुदेव,स्वप्नील वाकडे, संदीप पाटील, श्री भोसले, रत्नपारखी अवी बलिकाई,किरण कुरणे,यांच्या सह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.