भारत न्याय यात्रेतून राहुल गांधी पुन्हा मैदानात १४ जानेवारीपासून मणिपूरमधून सुरुवात

मुंबई:प्रतिनिधी

दि:२७: डिसेंबर:  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ आता ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyay Yatra) म्हणून ओळखली जाणार आहे. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा निघणार आहे. मुंबईमध्ये 20 मार्च रोजी इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सांगता सभा पार पडणार आहे. देशातील 14 राज्यांमधून ही यात्रा जाणार आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 6200 किलोमीटरची ही यात्रा मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश  मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र अशा 14 राज्यांमधून आणि 85 जिल्ह्यांतून निघणार आहे. या यात्रेच्या नावासोबतच प्रकारातही बदल करण्यात आला आहे. गतवेळची भारत जोडो यात्रा पायी होती. मात्र भारत न्याय यात्रा’ ही बस यात्रा असणार आहे.

यात्रेची उद्दिष्टे सांगताना वेणुगोपाल पुढे म्हणाले भारत न्याय यात्रा या नावातच यात्रेचे उद्दिष्ट प्रतिबिंबित होत आहे सबके लिए न्याय चाहिए ही भूमिका घेऊन यात्रा तरुण महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहे 14 जानेवारी रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात करणार आहेत मणिपूर हे राज्य या यात्रेतील महत्वाचे अंग असणार आहे.