राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव समीर कुपवाडे यांचा शरद पवार गटाच्या बैठकीस उपस्थिती.

विरोधकांवर साधला निशाणा

मुंबई:प्रतिनिधि

दि:०५:जुलै:मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव समीर कुपवाडे यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला 

यावेळी समीर कुपवाडे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून भाजपने Ed सारख्या संस्थेला पुढे करून राज्यातल्या स्थिर पक्षांना फोडण्याचा यशस्वी प्रयोग केला,

परंतु आज देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवर हल्ले असे प्रश्न आहेत. राज्यात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत चार हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. ज्या राजवटीत महिलांना संरक्षण मिळत नाही त्यांना राज्य चालवण्याचा काय अधिकार आहे का? असे प्रश्न उपस्थित करत सत्ताधारीवर जोरदार निशाणा साधला

पुढे महणाले की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे.

सत्ताधारी लोकांवर विश्वास ठेवणे योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हे एककलमी काम आपल्या सर्वांना करायचे आहे.

आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका.आपल्याला शरद पार साहेब व मा.जयंत पाटील साहेब व संजय बजाज साहेब यांचे हात बळकट करायचे आहेत जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या.आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करूया असे आव्हान समीर कुपवाडे यांनी केले

* काल होता होता काळरात्र झाली, 

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली! 

अशी घोषणा देण्यात आली 

त्यावेळी अल्पसंख्याक सेलचे आज्जु पटेल,मुन्ना शेख,सर्फराज शेख,रियाज शेख,अजीम फकीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.