सांगलीला नालसाहेब मूल्ला खून प्रकरण,पोलिसांनी २४ तासात छडा लावला, ३ आरोपींना अटक, मास्टरमाईंड कोण? जुनं कनेक्शन समोर

सांगली.प्रतिनिधि

दि:१९:जून:सांगलीतील २०१९ मधील महेश नाईक खून प्रकरणात मोक्कामध्ये जेलमध्ये असलेला आरोपी सचिन डोंगरे याला जामीन होऊ न देण्यासाठी आणि त्याला बाहेर येता येऊ नये यासाठी नालसाब मुल्ला प्रयत्न करत असल्याच्या कारणातून नालसाब मुल्ला याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासाच्या आताच या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनी कुरणे (वय २३), विशाल कोळपे (वय २०), स्वप्नील मलमे (वय २०) असे तीन आरोपींची नावे आहेत. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समवेश आहे. या चौघांनी शुक्रवारी नालसाब रहात असलेल्या ठिकाणाची रेकी केली होती. तसेच मुल्ला याच्या हालचालीची माहिती घेतली होती. यानंतर शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास या चौघांनी मुल्ला यांच्या वर गोळीबार करीत कोयत्याने हल्ला चढवत तिथून पलयन केले.

घटनेनंतर तातडीने पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तीन टीम द्वारे तपास सुरू केला. रविवारी सकाळी या हल्लेखोरांना पकडण्यात यश आले. या चौघांनी नालसाब मुल्ला यांच्या खुनाची कबुली दिली असून सचिन डोंगरे याच्या सांगण्यावरूनच खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. या दृष्टीने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक एलसीबी सतीश शिंदे, विश्रामबाग पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, अमितकुमार पाटील, पोलीस कर्मचारी दीपक गायकवाड, संदीप नलवडे, विनायक सुतार, विशाल कोळी, पोलीस मुख्यालयाच्या अरुण औताडे, आम्सिध्द खोत, अमोल लोहार यानी सहभाग घेतला, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.