शिरोळ:राम आवळे
दि .११ :स्व. सा. रे. पाटील यांनी समाज हितासाठी आयुष्य खर्ची घातले आहे. हीच परंपरा जोपासून सहकार, सामाजिक क्षेत्रात गणपतराव पाटील यांनी कर्तबगारी दाखवून दिली आहे. माय बहिणीवरील अत्याचार रोखून समाजात चांगुलपणा व सामान्य जनतेचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर महा विकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. मस्ती आणि माज आलेल्या प्रवृत्तीला गाडण्यासाठी जागरूक राहून मतदान करा, शिवारात आणि वावरात फरक असतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
नांदणी येथे मविआ उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रेनंतर झालेल्या विजय निश्चित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब लठ्ठे होते.
डी. पी. आय. चे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, लाडक्या बहिणीला पैसे दिले आम्हाला आनंद आहे, मात्र ही पैशाची उपलब्धता कशी झाली याची माहिती घेतली असता विविध योजनांतील पैसे महायुती सरकारने लाडक्या बहिणीकडे वळविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात असणारी शेत जमिनीची विक्री होणार आहे. रोजगार, उद्योग त्यांनी विकले असून शेतकऱ्यांनी जमीन सुरक्षित राहण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्यावे. चोराच्या हातात तिजोरी देऊ नका, असे सांगून प्रा. कांबळे यांनी गणपतराव पाटील यांना मत दिल्यानंतर सर्वांचा संसार सुखाचा होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्रेणिक नरदे, सतीश भंडारे, बाळसिंग रजपूत, संजय माने, अनिरुद्ध कांबळे, बाजीराव मालुसरे, अमन पटेल, जीवन बरगे, गणेश पाखरे, पांडुरंग रजपूत, सर्जेराव पवार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याची विनंती केली.
यावेळी माजी आमदार राजीव आवळे, हाजी अस्लम शेख, मधुकर पाटील, स्वाती सासणे, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, स्नेहलता देसाई, वसंतराव देसाई, रघुनाथ म्हेत्रे, विलास कांबळे, शेखर पाटील, संदीप बिरणगे, राजू पाटील, आदिनाथ कत्ते, नागेश कोळी, अमर सादुले, बापू आंबी, बापूसो परीट, दिनेश बुबणे, विठ्ठल सूर्यवंशी, वसंत कारंडे, बाबुराव ऐनापुरे, सर्जेराव चोपडे, दादा चौगुले, शितल उपाध्ये, दीपक कांबळे, राजू मोगलाडे, हमजू शेख, रफिक बेपारी, शशिकांत घाटगे, फैजल पटेल, प्रदीप पठारे, अरुण भंडारे, निशिकांत निटवे, सतीश भंडारे, अरविंद धरण गुत्ती कर, आदींसह मतदार, ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय सुतार व चंद्रशेखर कलगी यांनी केले. आभार आकाश कुरणे यांनी मानले.