राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट अव्वल

प्रथम क्रमांकासह विद्यार्थीनींसाठीचा विशेष पुरस्कार पटकाविला

यड्राव:कय्युम शेख 

दि . २३ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या
विविध विभागातील विद्यार्थ्यी राज्यस्तरीय डिपेक्स २०२३ अंतर्गत झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत
विजेते ठरले. तसेच वुमन अॅण्ड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हा विशेष पुरस्कारही शरदच्या
विद्यार्थांना मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डिपेक्स व सृजन यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित स्पर्धेमध्ये हे यश संपादन केले आहे.
सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी युज ऑफ नॅचरल फायबर्स इन ब्रिक्स या प्रोजेक्टला
प्रथम क्रमांक मिळाला. यामध्ये प्रणव पाटील, यश पाटील, समिर मुळीक, साहिल मुजावर हे
विद्यार्थी सहभागी होते. त्यांना सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. ए.बी. जाधव यांचे मार्गदर्शन
मिळाले.
इंडस्ट्रीयल अॅटोमाझेशन या थीम अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन विभागाच्या
विद्यार्थ्यांनी फॅशन उद्योगात आयओटीचा वापर करुन क्लग रिफलेक्टर प्रोजेक्ट या प्रोजेक्टला
व्दितीय क्रमांक मिळाला. यामध्ये विद्या मेंगाणे, प्रतिक्षा शेलार, नेहा माने सहभागी होते.
त्यांना डॉ. एस. एस. गुरव यांचे मार्गदर्शन केले.
वेस्ट मॅनेजमेंट या थीम अंतर्गत इलेक्ट्रीकल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी ऑईल स्किमर हा प्रोजेक्ट
सादर केला. त्याला व्दितीय क्रमांक मिळाला. यामध्ये संकेत कोले, अर्थव घाग, अमन मुल्ला,
महेश इंगवले हे विद्यार्थी सहभागी होते. त्यांना प्रा. एम.बी. मुल्लाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत मुलींसाठी वुमन अॅण्ड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन (WATI) हा विशेष महिला पुरस्कार
ठेवण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातून ४८ विद्यार्थींचे संघ सहभागी झाले
होते. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थीनींना हा विशेष पुरस्कार मिळाला. त्यांनी
एफिसिंअट स्मार्ट ब्रेसीस फॉर लाईफ थ्रेटनिंग डिसीस ऑफ प्रॅराप्लेजीया (पॅरेलिसिस झालेल्या
रुग्णांना चालणेसाठी आधुनिक सुविधा) हा प्रोजेक्ट सादर केला होता. यामध्ये साक्षी कुलकर्णी,
श्रावणी मुत्तुर, सुप्रिया घारसे, स्नेहल कोले हे सहभागी झाले होते. प्रकल्पाला प्राचार्य डॉ. एस.
ए. खोत, प्राचार्य बी.एस. ताशीलदार यांचे सहकार्य मिळाले.