जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये शारदोत्सव अनोख्या उत्साहात!

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उधाण!!

संगमेश्वर : सचिन पाटोळे 

दि.१५ :जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये शारदोत्सव अनोख्या उत्साहात पार पाडला .विद्येची देवता शारदा मातेच्या पुजनाने व पाटी पुजनाने पहिल्या दिवशी  सुरवात उत्साहात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सजावट केली, रांगोळी रेखाटली होती .  शाळेतील वातावरण मंगलमय होते .

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे रंगीबेरंगी कपडे घातले होते . मुलींनी साडी,घागरा, घालून नटूनथटून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. तसेच या कार्यक्रमाला सर्व पालकांनीही उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पारंपरिक टिपरी नृत्य,भजन, रास गरबा, ग्रामीण भागातील लोक गीते यांसारख्या कार्यक्रमांची दोन दिवस रेलचेल होती.मध्यान्ह भोजना सोबत गोड शीरा ,व व्हेज पुलाव असा सात्विक आहार या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना देण्यात आला.आपल्या कला गुणांना न्याय देत दोन दिवस जिल्हा परिषद शाळा राजीवली या शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. या कार्यक्रमाचे योग्य पद्धतीने नियोजन मुख्याध्यापक श्री गजानन पाटील सर, श्री चव्हाण सर, श्री बगाड सर व सर्व पालक यांनी केले होते .