शिरोळ: राम आवळे
दि. ३ :श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२४- २०२५ या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १०-५१ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभहस्ते काटापूजन करण्यात आले.
प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे कामकाज चालू आहे. या हंगामासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन रुपये ३१४०/- देणार असून या हंगामात १५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सांगून सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली.कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू गोपाळ माने-गावडे, जोतीकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, विजय सुर्यवंशी, महेंद्र बागे, संचालिका सौ. संगिता पाटील- कोथळीकर, सौ. अस्मिता पाटील, बाळासाहेब पाटील-हालसवडे, मलकारी तेरदाळे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री, कामगार संचालक प्रदिप बनगे यांचेसह डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगांव बँकेचे संचालक भूपाल खामकर, महादेव राजमाने, प्रा.सुकुमार कांबळे-सर, शिवसेना
जिल्हाध्यक्ष वैभव उगळे, उद्योगपती अशोक कोळेकर, भवानीसिहं घोरपडे माजी नगरसेवक सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, अमरसिंह निकम, युनुस डांगे, बंडा मिणीयार, ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर, त्यांचे सर्व सहकारी, अमोल चव्हाण, नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, बापूसो परीट, शितल उपाध्ये, दिपक कांबळे, ज्ञानदेव बुबणे, दिगंबर देशपांडे, शितल सदलगे, राहूल चौगुले, रावसाहेब गळतगे, बाबासो पाटील, संदिप कुरुंदवाडे, राहूल चौगुले, तुकाराम पाटील, सुरगोंडा पाटील, सुरेश आरगे, आप्पासो पाटील, अमोल जगदाळे, काकासो पाटील, कॉम्रेड रघुनाथ देशींगे, बबलू नलवडे, महेश भोसले, बाबासाहेब पाटील व सर्व खातेप्रमुख, ऊर्जाकुर श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ, कामगार ट्रस्ट, कामगार सोसायटी,कामगार युनियनचे पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू, कार्यकर्ते, हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते