कोल्हापूर :प्रतिनिधी
दि १४: महाराष्ट्र- कनाटक राज्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणार्या विशाळगड वरिल मलिक रिहान दर्ग्यावरती व परिसरात काही समाजकटकांनी आज दगडफेक केली.विशालगड दर्गा जवळील फुल अगरबत्ती विकणाऱ्या मुस्लीम समाजातील अतिक्रमान केलेल्या दुकानदाराची दुकाने उद्वस्त करण्याच्या उद्देशाने हिंदुत्ववादी संघटनानी आज विशालगड येथे एकत्र जमले होते . यातील काही समाज कंटकांनी यांच्या वर हल्ला करत मोठी दगड फेक हि केली .पोलीस बंदोबस्त असताना देखील अशी घटना घडते .यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यावर हि तलवारीने हल्ला झाला .याचा व्हिडीओ सोशलं माध्यमावर फिरत आहे .याबाबत अनेक स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे .
विशाळगडवरील हिंदू मुस्लिम ऐक्याचे मलिक रिहान दर्ग्यावरती काही समाजकटकांनी दगडफेक केली आज झालेल्या घटनेमध्ये पोलिसां वरती ही तलवार हल्ला झाला आहे घटना घडण्यापूर्वी गडावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवायला पाहिजे होता तो ठेवण्यात आलेला नव्हता असे सांगण्यात येते . गडाच्या खाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .दर्गा जवळ जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत
कॅमेरा मध्ये जे जे लोक त्यात दिसतात त्या सर्वावरती कारवाई प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे जी अतिक्रमण व अवेध व्यवसाय करणारे सर्व जातीच्या लोकांचे अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजाचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाहीये दर्गा व मस्जित ही एक हजार वर्षांपूर्वीची आहे कोल्हापूर गॅझेट मध्ये नोंद आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील एक हिंदू मुस्लिम ऐक्याचे स्थान आहे
ज्या समाजकंटकांनी दर्ग्यावरती दगडफेक केली त्यांच्यावर आणि ज्या लोकांनी यांना भडकले त्या सर्व वरती कारवाई व्हायला पाहिजे असे पत्रक गणी आजरेकर चेअरमन मुस्लिम बोर्डिंग
कादरभाई मलबारी प्रशासक मुस्लिम बोर्डिंग रफिक शेख यांनी प्रसिद्ध ला दिले