श्रीमंत गंगामाईची संविधान रॅली संपन्न

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि .९ : भारतीय संविधानाला ७५  वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने संविधान अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने संविधान जागरुकतेसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीच्या प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विषद केले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी ‘संविधान आमचा स्वाभिमान’, ‘माझे संविधान माझा अभिमान’ अशा प्रकारच्या घोषणा देत, फलक घेऊन रॅली काढली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.पुढे रॅली महात्मा गांधी पुतळा येथे पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणांच्या गजरात रॅली प्रशालेत परत आली.

याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक श्री एस. एस. कोळी, विभाग प्रमुख सौ. एन. पी. राणे, श्रीमती एस. एस. शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.