कडवई🙁दिपक तुळसणकर)
भाऊसाहेब खंडेरा वालावलकर रुग्णालय, कासारवाडी, सावर्डे येथे १२ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार असून, डॉ. सतीश गोरे (एंडोस्कोपिक स्पाईन सर्जन) आणि डॉ. सुनील नाडकर्णी (स्पाईन सर्जन) रुग्णांची सेवा करणार आहेत.
शिबिरामध्ये गुडघा दुखी,कंबरदुखी,पाठीतून पायात वेदना पसरणे,पाठीतून पायात मुंग्या येणे,टाच दुखी,मानेचे दुखणे,मानेतून हातात वेदना किंवा मुंग्या पसरणे, अशा समस्या असलेल्या रुग्णांना तपासणी व उपचारासाठी संधी उपलब्ध आहे.तसेच क्ष-किरण (X-Ray),एम.आर.आय. स्कॅन (MRI Scan) तपासण्या केल्या जातील.
रुग्णांनी पूर्वी केलेले तपासणी अहवाल (X-Ray, CT Scan, MRI) सोबत आणावेत. शस्त्रक्रिया पूर्व तपासणीसाठी वालावलकर रुग्णालयाच्या ओ.पी.डी. क्र. ४ मध्ये सकाळी ९:०० ते सायं. ५:०० या वेळेत हजर राहावे.चिपळूण शहरातून रुग्णालयापर्यंत रुग्णांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा,
डॉ. ओंकार सुदामे 8956364664,संकेत जांभळे: 9922566639,सचिन धुमाळ: 9272897834.
शिबिराचे ठिकाण भ.क.ल. वालावलकर रुग्णालय,
कासारवाडी, सावर्डे,ता. चिपळूण, जि. रत्नागिरी – ४१५६०६. हे शिबीर मणक्याच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.