सदलगा तपासणी नाक्याला तहसीलदारांची भेट

सदलगा:सौ .वैशाली भोसले 

दि .११:येथील सदलगा – दत्तवाड रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्याला चिकोडीचे तहसीलदार सी. एस. कुलकर्णी , डीवायएसपी गोपाल गौडर, सीपीआय नागय्या काडदेव यांनी आकस्मिक भेट देऊन तपासणी पथकाच्या कार्याची पाहणी केली.
आगामी लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होऊ नये यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या हद्दीच्या दरम्यान सदलगा या शहरी निवडणूक आयोग व कर्नाटक सरकार यांच्यावतीने सदलगा येथे दूधगंगा नदी किनारी दत्तवाड रस्त्यालगत चेक पोस्टची उभारणी करण्यात आली आहे. या चेक पोस्टला रात्री ९ वाजता चिकोडीचे तहसीलदार, चिकोडीचे डीवायएसपी व सीपीआय यांनी भेट देऊन चेक पोस्टवरील कार्याचा आढावा घेऊन संबंधितांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी स्वतः तहसीलदार कुलकर्णी यांनी अनेक वाहनांची तपासणी करून कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या. या मार्गावरील सर्व बसेसची तपासणी करावी असे यावेळी वरिष्ठ मार्फत सांगण्यात आले. सर्व कार्य व्यवस्थित चाललेले असल्याचे पाहून त्यांनी समाधानही व्यक्त केले. या भेटी प्रसंगी कार्यरत असलेले कर्मचारी सेंट्रल एक्साईज कॉन्स्टेबल अर्जुन अल्लापुर, मोरारजी देसाई, वस्ती शाळेचे प्रिन्सिपल चंद्रप्पा मुरगोड, जनवाड ग्रामपंचायत कर्मचारी मल्हनगौडा पाटील, खडकलाट पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल बी. वाय. बजंतरी, एफएसटी टीमचे जे. वाय. खोत, सदलगा शहरातील रेव्ह्यून्यू डिपार्टमेंटचे उप तहसीलदार शीलवंत तलाठी, नीलकांत खाडे, कर्मचारी अकबर सनदी, सलीम सनदी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.