नवी दिल्ली,: प्रतिनिधी
दि.२३ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदनात आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.