नवी दिल्ली:प्रतिनिधि
दि:३०:जुन:जुन:सुंदर त्वचेसाठी बाजारामध्ये खूप उत्पादाने मिळतात. पण या उत्पादनांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचेचे नुकसान होते. परंतु नैसर्गिक पद्धती वापरल्याने त्वचेला इजा होत नाही
पावसाळा सुरू झाला आहे. या काळात साथीचे आजार, त्वचेचे आजार निर्माण होतात. यासाठी बाजारात अनेक उत्पादने आहेत. पण या उत्पादनांमुळे त्वचेचे नुकसान होते. यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांनी काही सोपे उपाय सांगितले आहे. योगासने, आसन आणि सर्व नैसर्गिक औषधी वनस्पतींच्या वापराने सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक रोगांवर उपचार करता येतात. त्याचप्रमाणे योग आणि आयुर्वेद हे शरीरातील प्रत्येक अवयव निरोगी ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी मार्ग आहेत.
चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय.
कपालभाती प्राणायाम ही श्वास घेण्याची प्रक्रिया आहे जी फुफ्फुसांना निरोगी ठेवते. त्यामुळे फुफ्फुसात अधिकाधिक ऑक्सिजन पोहोचतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. 4 महिने हा प्राणायाम केल्याने तुमच्या त्वचेला एक अप्रतिम चमक येईल. हे दिवसातून दोनदा 15 मिनिटांसाठी करा. यामुळे त्वच्याच नाही तर तुमचे आरोग्या देखील सुधरण्यास मदत होईल.
बाबा रामदेव यांच्या मते, तुम्ही कोल्ड ड्रिंक्स वगैरे सोडून रोज ताज्या फळांचा रस प्यावा. यामुळे रक्त शुद्ध राहते आणि तुमची त्वचा चमकते. यामध्ये तुम्ही भाज्यांचा देखील समावेश करू शकता.
दिवसातून दोनदा कोरफडाच्या लगद्याने चेहरा, मान आणि हातांना मसाज करा. यामुळे त्वचेची चमक वाढेल.
बाबा रामदेव म्हणतात की, रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावावे. सकाळी उठून थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते. असे रोज केल्याने चेहराही गोरा होतो.
बाबा रामदेव शक्य तितके नैसर्गिक राहण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते बेसन चेहऱ्यासाठी खूप चांगले असते. याचा वापर दररोज चेहरा धुण्यासाठी केला जाऊ शकतो. बेसनाचे पीठ गुलाब पाण्यात मिसळूनही फेस पॅक बनवता येतो. हा फेसपॅक 2 आठवडे रोज लावल्याने त्वचा सुंदर होते.
सुंदर त्वचा मिळविण्यासाठी पुरेशी झोपही खूप महत्त्वाची आहे. यासाठी झोपण्याचा नित्यक्रम करा. दररोज 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. बाबा रामदेव सांगतात की, माणसाने रात्री १० वाजेपर्यंत किंवा ११ वाजेपर्यंत झोपावे.