रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि .४: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावातून गडनदी वाहते . पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामूळे नदीचे पाणी गावात शिरत असल्यामुळे नदीला संरक्षण भिंत बांधावी असे नागरिकाची मागणी आहे .या संदर्भात येथील नागरिकांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे .परंतु याकडे प्रशासन व लोक प्रतिनिधी दुर्लक्ष केले आहे .त्यामुळे येत्या २०२४ विधानसभा निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे.
दि.३ऑक्टोबर २०२४ रोजी समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने स्वायत्त कोकण संघर्ष यात्रा संपुर्ण कोकणात चालु असताना रातांबी गावातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक श्री संजय यादवराव यांनी कोकणाच्या विकासाबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा केली.कोकणाच्या विकासाठी सहा दिवस जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला ग्रामस्थ सोबत संजय यादवराव देखील बसलेले असताना. कोकणातील एकाही नेत्याला जाग आली नाही किवा सहा दिवसात साधी विचारपूस ही कोणी केली नाही. . त्यामुळे ग्रामस्थाकडून ठराव केला की येत्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण गावातील १८५ मतदारांनी बहिष्कार टाकणार